Tuesday, July 28, 2015

"Aniruddha's Institute of Sports and Bonsai Sports"



ध्याचे जग एवढे fast झाले आहे की, आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला फारसा वेळच नसतो. शाळेत जाणार्‍या मुलांचे शाळा आणि coaching classes आणि मोठ्या माणसांचे घर - office - घर असे वेळापत्रक झाले आहे. धकाधकीच्या जीवनात आपण आपल्यालाच हरवून बसलो आहोत. घरी आलो तरी, एकतर TV नाहीतर Mobile ह्यामध्ये अडकून बसतो, आणि ह्या सगळ्यांमध्ये एक महत्तवाची गोष्ट आपण नजरेआड केली आहे, ती  म्हणजे "खेळ".

आता खेळ म्हटले तर आपल्यासमोर येते म्हणजे "cricket, basket ball, hockey, badminton, tennis" इत्यादी खेळ. हे खेळ उत्तम आहेतच, त्याबाबत शंकाच नाही. पण जरा आता आपल्या बालापणांत डोकावून बघूया. लगोरी, "बटाटा शर्यत, विटीदांडू, लंगडी, रुमाल चोर" खेळ कोणाकोणाला आठवत आहेत का? मजा केली होती ना हे खेळ खेळताना ? खरचं खेळल्याने अभ्यासाचा ताण पटकन दूर व्हायचा. आणि खरच जीवनात खेळांचे खूप महत्व आहे. दैनंदिन कामकाजाच्या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी खेळ मदत करतात. मैदानी खेळ खेळल्यामुळे मानसिक आरोग्याबरोबरच शारीरिक आरोग्य देखील उत्तम राहते. तसेच खेळातून देखील ऊर्जा मिळते. आणि मुख्य म्हणजे मनात सांघिक भावना निर्माण होते.

खेळासाठी मोठे मैदान हवेच असे काही नाही. छोट्या गल्लीमध्ये किंबहुना लहानश्या जागेत सुद्धा आपल्याला खेळता आले पाहिजे. आणि ह्यासाठीच आपल्या लाडक्या बापूंनी (DAD) "Aniruddha's Institute of Sports and Bonsai Sports" ची स्थापना केली. इथे आपण वेगवेगळे खेळ मनसोक्त खेळू शकतो. ह्या institute अंतर्गत प्रशिक्षक तयार केले जातात आणि मग त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन वेगवेगळ्या केंद्रांवर शिकवण्यासाठी पाठविले जाते. आणि विशेष म्हणजे ह्यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही.

मग आता रविवारची सकाळ झोपण्यासाठी न घालवता आपण आपल्या आरोग्यासाठी म्हणजेच खेळासाठी देऊया !!!

काय मग, येणार ना ह्या रविवारी?

- Aniruddha's Institute of Sports and Bonsai Sports Team


For any query please contact:- 

१) मंगेशसिंह पाटणकर - 9820111376
२) प्रसादसिंह देशपांडे - 8691013863
३) राजेशसिंह चव्हाण - 9820231903
४) सुप्रियावीरा सरदेसाई - 9969977472

No comments:

Post a Comment